शिर्डीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला गेला. शिर्डी साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

Updated: Aug 25, 2016, 11:01 AM IST
शिर्डीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा title=

शिर्डी : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला गेला. शिर्डी साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन बाल कन्हैयाचं गुणगान करण्यात आलं. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं साईमंदीरात किर्तन पार पडल्यावर रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अष्टमीच्या या उत्सवासाठी साईमंदीराच्या आतील आणि बाहेरील परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. त्याच बरोबरीने द्वारकामाई, गुरुस्थान आणि इतर मंदीरंही फुलांनी सजविण्यात आली. गोकुळ अष्टीमीचं औचित्य साधत साईंच्या दर्शनासाठी भक्तांनी शिर्डीत गर्दी केली.