नागपूर : मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
मनमाडपासूनजवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १३ मोर मृतावस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीय. मोरांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय.
नागापूरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात पशू-पक्षी आढळून येतात. मात्र उन्हाळ्यात वन विभागाकडून प्राण्यांसाठी पाण्याची कुठलीच व्यवस्था करण्यात येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांना वणवण करावी लागत असल्याचं ग्रामस्थ सांगतात.
तर जंगलात काही भागात पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. मात्र निधीअभावी सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात अडचण येत असल्याचं वनपाल सांगतात. चैत्रातच वैशाख वणवा जाणवू लागलाय. वन्यप्राण्यांसाठी वेळीच पाण्याची व्यवस्था केली नाही तर परिस्थिती आणखी भयावह होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.