पालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन

पालघरचे  शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.  रात्री दिड वाजताच्या सुमारास एका लग्न समारंभातून घरी परततांना डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ ही घटना घडली आहे. 

Updated: May 24, 2015, 09:24 AM IST
पालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन title=

पालघर: पालघरचे  शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.  रात्री दिड वाजताच्या सुमारास एका लग्न समारंभातून घरी परततांना डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ ही घटना घडली आहे. 
 
दोन दिवसांपूर्वीच कृष्णा घोडा  यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर उपाध्यक्षपदी निवड झाली होती. या  आधी कृष्णा घोडा तीन वेळा राष्टवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. 
 
२०१४च्या निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळवित त्यांनी काँग्रेसचे राज्यमंत्री राजेंद्र गावीत याचा ५१५ मतांनी पराभव केला होता. आज दुपारी एक वाजता डहाणू इथं त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

कृष्णा घोटा यांचा अल्पपरिचय -

संपूर्ण नाव - कृष्णा अर्जुन घोडा

जन्मः १ जून १९५४

राजकीय कारकीर्दः

• १९८२ - डहाणू युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद
• १९९२ - सभापती, पंचायत समिती डहाणू
• १९९६ - सभापती, पंचायत समिती डहाणू
• १९९७ - सभापती, पंचायत समिती डहाणू
• १९९८ - डहाणू इथं झालेल्या पोट निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.
कार्यकाळ १३ महिने
• १९९९ - राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना, डहाणू इथून राष्ट्रवादीचे
 आमदार म्हणून निवडून आले.
• २००४ - डहाणू इथून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले.
• २००९ - डहाणू इथून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविताना ४६,३५० मतं
 मिळविली, माकपाकडून १६१८० मतांनी पराभव.
२०१४- राष्ट्र्वादीला रामराम ठोकत शिवसेनेकडून तिकीट मिळवून पालघर
विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांचा ५१५
मतांनी पराभव केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.