औरंगाबाद : वेगळ्या मराठवाड्याच्या चर्चेसाठी आज औरंगाबादेत श्रीहरी अणे यांचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम शिवसेनेनं उधळला आहे..
कार्यक्रमाच्या ठिकाणी अने येण्या आधीच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती, अणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्दा केली, पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी लावला होता अनेची गाडी येताच शिवसैनिकांनी दगडफेड सुरु केली यात अनेंच्या गाडीची मागची काचही फुटली, शिवसैनिकांचे हे रूप पाहून अणेंनी काढता पाय घेतला.. त्यामुळं आयोजकांना कार्यक्रम सुद्दा आवरता घ्यावा लागला...
दरम्यान शिवसैनिकाआधी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्दा अणेंच्या विरोधात निदर्शन केली.. तीन मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, दरम्यान वेगला मराठवाड्याची भाषा करणा-यांना शिवसेना असाच धडा शिकवेल अस शिवसैनिकांनी सांगितलय..