मुख्यमंत्र्यांच्या सभेची शरद पवारांनी उडवली खिल्ली

मुख्यमंत्र्यांची आज पुण्यात प्रचंड मोठी सभा झाली, उभ्या महाराष्ट्राने अशी सभा पाहिली नसेल. कारण त्यांच्या सभेला लोक नाही तर मुखंयमंत्री स्वतःच वाटबघत बसले होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगवी येथील जाहीर सभेत केली.

Updated: Feb 19, 2017, 01:13 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या सभेची शरद पवारांनी उडवली खिल्ली title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांची आज पुण्यात प्रचंड मोठी सभा झाली, उभ्या महाराष्ट्राने अशी सभा पाहिली नसेल. कारण त्यांच्या सभेला लोक नाही तर मुखंयमंत्री स्वतःच वाटबघत बसले होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगवी येथील जाहीर सभेत केली.

पवार म्हणाले की, पुण्यात मुख्यमंत्र्यांची प्रचंड मोठी सभा झाली. उभ्या महाराष्ट्राने इतिहासात अशी सभा पाहिलेली नाही. आता येतील मग येतील म्हणून मुंख्यमंत्रीच वाट बघून कंटाळून गेले. मी ही अशी आत्तापर्यंत 50 वर्षात मुख्यमंत्र्यांची सभा पाहिली नव्हती. ते स्टेजजवळ आले 5 मिनिट झाले 10 मिनिट झाले 15 मिनिट झाले 20 मिनिट झाले तरी आलेच नाहीत. कारण कुणी दिसेना म्हणून गिरीश बापट यांना त्यांनी सांगितले तुम्ही बोला आणि ते पिंपरीकडे आले. पिंपरीत पण त्यांना चिंता, कारण आधीच एक सभा रद्द झाली होती आता दुसरी सभा ही आजची रद्द होऊ नये, म्हणून लोकांना बोलावून बोलावून बसवले आणि म्हणाले माझी अब्रु वाचवा. अशा तर यांच्या इतिहास गाजवणाऱ्या सभा. त्यांच्या या आधीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सभा रद्द झाल्या होत्या, असा टोलाही त्यांनी लगावला.