शरद पवार, अजितदादांवर टीका; जानकर यांचे कार्यालय फोडले

बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे, असा अजित पवार यांच्यावर घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला. त्यानंतर जानकर यांचे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयाने फोडले. 

Updated: Oct 12, 2016, 04:52 PM IST
शरद पवार, अजितदादांवर टीका; जानकर यांचे कार्यालय फोडले title=

पुणे : बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे, असा अजित पवार यांच्यावर घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला. त्यानंतर जानकर यांचे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयाने फोडले. 

भगवानगड येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील जानकर यांचे कार्यालय फोडले.

जानकर यांनी शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दल आक्रमक भाषेत टीका केली. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर आणि कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली यावेळी कार्यालयाच्या फलकाची मोडतोड करीत निदर्शने केली. 

जानकर यांची भाषा मंत्रिपदाला शोभणारी नाही. त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केले, तर त्याला चोख उत्तर देऊ, असे चाकणकर यांनी यावेळी इशारा दिला.