बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न

पुण्यात काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Oct 12, 2016, 02:10 PM IST
बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न title=

पुणे : पुणे शहरातील बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाई फेकिचा प्रयत्न झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

या प्रकरणी ४ ते ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे. हे रासपचे कार्यकर्ते आहेत की दुसऱ्या कोणत्या पक्षाचे याची चौकशी सुरू आहे.

बारामती होस्टेल हे पुण्यात आहे, ते शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानचं होस्टेल आहे.