एवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला

बहुचर्चित अशा अभिनेता सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात अनेक बड्या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी चुप्पी साधणंच पसंत केलं. परंतु, आज मुंबई उच्च न्यायालयानं सेशन कोर्टानं सलमानला सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या विषयावर आपलं मौन सोडलंय. 

Updated: May 8, 2015, 04:52 PM IST
एवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला title=

रत्नागिरी : बहुचर्चित अशा अभिनेता सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात अनेक बड्या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी चुप्पी साधणंच पसंत केलं. परंतु, आज मुंबई उच्च न्यायालयानं सेशन कोर्टानं सलमानला सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या विषयावर आपलं मौन सोडलंय. 

बुधवारी, सेशन कोर्टानं सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर जे जे लोकांनी सलमानची भेट घेण्यासाठी एवढा उत्साह दाखवला तो दाखवण्याची काहीच गरज नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलंय. पवारांची हा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी असू शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीय. 

उल्लेखनीय  म्हणजे, सलमानला सेशन कोर्टात शिक्षा सुनावली गेल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. यावर बरीच टीका झाली होती. राज ठाकरे यांच्यासोबतच, गणेश नाईक, निलेश राणे या राजकीय नेत्यांनीही सलमानची त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली होती.

तसंच यावेळी शरद पवार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांच्यावरही निशाणा साधलाय. 'देशात गरिबांना न्याय मिळत नाही, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने त्या विश्वासाला पुन्हा एकता तडा गेला आहे' अशी प्रतिक्रिया सिंह यांनी व्यक्त केली होती. यावर, सत्यपाल सिंग यांनी जर त्यांच्या पक्षाचं मत मांडल असेल तर ती चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. ते रत्नागिरीत बोलत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.