सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी

उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.

Updated: May 8, 2015, 04:12 PM IST
सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी  title=

नाशिक : उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.

लालसर दिसणारी टरबूज पाहून तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलंच. उन्हाचा पारा चाळीशिजवळ जात असताना कमी किंमतीतली ही टरबूज रस्त्यावर आकर्षित करत आहेत. मात्र नागरिकांनो सावध व्हा, ही लालचुटूक टरबूज नैसर्गिक असतीलच असे नव्हे. यांना इंजेक्शन देऊन त्यांना लालसरपणा आणि कृत्रिम गोडवा आणला जातोय.

शेतात टरबुजांची लवकरात लवकर वाढ व्हावी, आकार आणि वजनही वाढावे यासाठी किमया इथील नावाची इंजक्शने दिली जातात. या इंजेक्शनचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम म्हणून पोटाचे विकारही उद्भवतात. सिन्नरमध्ये दररोज चार ते पाच मुलांना अशी बाधा होतेय.

सिन्नर नगरपरिषदेच्या दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत असून खासगी दवाखान्यातही रूग्णांचं प्रमाण वाढलेले आहे. शहरात सर्रास उघडपणे ही टरबूज विकली जात असून औद्योगिक वापरातला बर्फ टरबूज गार ठेवण्यासाठी वापरला जात आहे. 

अनेक ठिकाणी उघड्यावर असणाऱ्या टरबूजांवर माशा किडे बसत असल्याने, आजाराला आयतं आमंत्रणच मिळत आहे. अशा सर्व विक्रेत्यांना जरब बसविण्याची आवश्यकता असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे.

घरात फ्रीज असल्याने प्रत्येक जण टरबूज थंडगार करून खातोय. त्यामुळे विशेषतः लहान मुलांना या टरबुजांची चव लक्षात येत नसल्याच दिसून आले आहे. त्यामुळे पालकांनो टरबूज खाताना विशेष काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.