शरदरावांपेक्षा माझ्यावर जबाबदारी अधिक.... - पंतप्रधान

बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 'व्हॅलेन्टाईन डे' रंगलाय. बारामतीत मोदी - पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 

Updated: Feb 14, 2015, 02:34 PM IST
शरदरावांपेक्षा माझ्यावर जबाबदारी अधिक.... - पंतप्रधान title=

बारामती : बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 'व्हॅलेन्टाईन डे' रंगलाय. बारामतीत मोदी - पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 

काय म्हणतायत नरेंद्र मोदी... 
- अॅग्रो टेक्नॉलॉजीवर भर देणं आवश्यक, कृषीक्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्याची गरज - मोदी
- देशाचा विकास हा माझा आणि शरद पवारांचा उद्देश - मोदी
- शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची केली विनंती
- कृषी विज्ञान केंद्रांत विद्यार्थ्यांना माती परीक्षणाचं ट्रेनिंग देण्याचा सल्ला दिलाय... यासंबंधी सगळ्या मुख्यमत्र्यांशी चर्चा केलीय
- तंत्रज्ञानाचा योग्य वापर व्हायला हवा
- मी पवारांकडून वारंवार सल्ले घेतो... त्यांचे अनुभवी सल्ले नेहमीच मिळतात
- महिन्यातून २-३ वेळा शरद पवारांशी बोलणं होतंच... 
- म्हणूनच शरदरावांपेक्षा माझ्यावर जबाबदारी अधिक.. मला जाऊन त्यांना विचारायला हवं की प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील... 
- सत्तेत बसणाऱ्यांची जबाबदारी अधिक असते... 
- (मोदी-पवार) आमच्या दोघांसाठी दलापेक्षा देश आहे... - पंतप्रधान
- दोन पक्षांच्या नेत्यांची भेट ही बातमी का बनते?
- विरोधी पक्षांची भेट ही सहज प्रक्रिया 
- पवार-मोदी भेटीच्या चर्चेवर प्रतिक्रिया
- जिथे मती आणि गती असते तिथेच प्रगती असते - पंतप्रधान मराठीत 
- शेतकऱ्यांमध्ये मती आणि गती आहे  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.