सातारा : साताऱ्यातले शहीद जवान गणेश ढवळे यांच्या घरी आक्रोश सुरु आहे. 29 वर्षीय गणेश यांच्या मृत्यूच्या बातमी येताच आसरे आंबेदरवाडीतल्या त्यांच्या गावावर शोककळा पसरलीय.
गणेश यांच्या मागे पाच महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे. ही दु:खद बातमी समजल्यानंतर गणेश यांच्या कुटुंबांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
जम्मू काश्मीरातल्या हिमस्खलनात गणेश शहीद झालेत. 2012 साली गणेश सैन्यात भरती झाले होते. वातावरण अनुकूल असेल तर शहीद गणेश यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत वाईमध्ये पोहण्याची शक्यता आहे.
गणेश यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या घरी त्यांचे मित्र, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोलीस निरिक्षक वेताळ आणि वाईतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलीय.
सामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून ते २०१२ साली सैन्यात भरती झाले होते. त्यांचे आई-वडील शेती करतात. गणेश यांचा तीन वर्षापूर्वी रेश्मा हगवणे-देसाई यांच्यासोबत विवाह झाला असून त्यांना समर्थ हा पाच महिन्याचा मुलगा आहे.