वसईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वसई पुर्व एव्हरशाईन सिटी या उच्चभ्रु वस्तीत चालणा-या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफ़ाश झाला आहे. 

Updated: Apr 24, 2015, 11:54 AM IST
वसईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश title=

वसई : वसई पुर्व एव्हरशाईन सिटी या उच्चभ्रु वस्तीत चालणा-या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफ़ाश झाला आहे. 

यात दोन अल्पवयीन आणि तीन सज्ञ मुलींची सुटका करण्यात आली असुन त्यांना बाल आणि महिला सुधारगृहात पाठविण्यात आलय. तर सेक्स रॅकेट चालवणा-या दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आलीय. 

पिंकी गणेश नायडु, कांचन जयवंत ठाकुर या दोन महिलांसह फ़िरोज नसिर खान हे सेक्स रॅकेट चालवित होते. 

तुळींज पोलिसांना मिळालेल्या माहिती वरुन पोलिसांनी एक बोगस गि-हाईक पाठवुन या सेक्स रॅकेटचा पर्दाफ़ाश केला. 

याबाबत अनैतिक व्यापार प्रतिबंदक कायदा आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम या कलमान्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.