शिष्यवृत्तीवर समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांचा डल्ला

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांनी त्यावरच डल्ला मारल्याचं समोर आलंय. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत हेराफेरी झाल्याचे दिसत आहे. प्रथमदर्शनी १ कोटी १५ लाखांचा घोटाळा उघड झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

Updated: Jun 12, 2015, 01:10 PM IST
शिष्यवृत्तीवर समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांचा डल्ला  title=

संजय पवार, सोलापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांनी त्यावरच डल्ला मारल्याचं समोर आलंय. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत हेराफेरी झाल्याचे दिसत आहे. प्रथमदर्शनी १ कोटी १५ लाखांचा घोटाळा उघड झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

राज्याच्या समाजकल्याण कार्यालयाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात येतं. राज्यभरात ऑनलाईन पद्धतीनं शिष्यवृत्तीच्या रकमेचं वाटप सुरू आहे. पुण्याच्या मास्केट कंपनीकडे कंत्राटी पद्धतीनं हे काम देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या सारिका काळे, स्मिता साळुंखे, सोनाली पांडे नावाच्या कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचं उघड झालं आहे.

समाजकल्याण विभागाकडून मात्र कुठलीही कारवाई होत नव्हती. मात्र विद्यार्थ्यांनी हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर विभागानं संबंधित कंपनीसह ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिलेत. 

सरकारनं दोषींवर लवकरात लवकर कारवाई करुन न्याय मिळवून द्यावा एवढीच या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.