सरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत

अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय. 

Updated: Nov 23, 2016, 07:54 PM IST
सरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत title=

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय. 

या घटनेबाबत असंवेदनशील राहून महसूल खात्याने दिरंगाई केल्याने आम्हाला कर्नाटक राज्यात सामील व्हावसं वाटतंय अशी संतप्त आणि खंत व्यक्त करणारी भावना या आळगी ग्रामस्थांनी बोलून दाखवलीय. 

वाळूमाफियांच्या असंवेदनशील आणि स्वार्थी कृतीमुळे शेतकऱ्यांना दोन महिने पुरेल इतके पाणी  कर्नाटकला वाहून गेले आहे.