मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी २६ विशेष गाड्या सोडणार आहे. वसई ते रत्नागिरी आणि मडगावसाठी या विशेष गाड्या असणार आहेत.
रत्नागिरीपर्यंत १५ तर मडगावसाठी ५ आणि मंगळुरुसाठी ६ गाड्या सोडण्यात येणार आहे. या गांड्यांचे आरक्षण १० सप्टेंबरपासून ऑलनाईन करता येणार आहे.
याआधी मध्य रेल्वेने १८० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेय. आता पश्चिम रेल्वेने नव्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने गणेश भक्तांना दिलासा मिळालाय.
रत्नागिरी विशेष रेल्वेगाडी
गाडी क्रमांक 00118 रत्नागिरी - वसई रोड एक्सप्रेस 05,00 वाजता सुटेल. ही गाडी 4, 19, 22, 23, 24 आणि 29 सप्टेंबर 2015 अशी सोडण्यात येणार आहे.
तर वसई परतीसाठी 00117 ही गाडी रत्नागिरीतून 13.45 सुटेल. 13, 14, 18, 19, 21, 22, 23, 28 आणि 29 सप्टेंबर -2015 अशी गाडी धावेल. या गाडीला थांबे संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, माणगाव आणि पनवेल असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.