पुण्यात शॉर्टसर्किंटने अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू, ५ जखमी

पुण्यात एका अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून यामध्ये ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंहगड रोडवरील पानमळा वसाहतीत महावितरणच्या पोलची वायर तुटून ही शॉर्टसर्किटची घटना घडली

Updated: Sep 8, 2015, 11:58 PM IST
 title=

पुणे : पुण्यात एका अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून यामध्ये ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंहगड रोडवरील पानमळा वसाहतीत महावितरणच्या पोलची वायर तुटून ही शॉर्टसर्किटची घटना घडली
 
पावसामुळे वीजेच्या पोलची तार तुटली. यामध्ये अद्वेता वाघमारे या अडीच वर्षाच्या मुलीला आपले प्राण गमवावे लागले. महावितरणच्या पोलवर मोठ्या प्रमाणात वायरचे जाळं आहे. याबाबत वारंवार सांगूनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे. 
 
घटनेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. पावसामुळे पोलवरील एका तारमधील वीजप्रवाह शेजारील घराच्या जिन्यामधे उतरला. यामुळे 5 महिला लांब फेकल्या गेल्या, परंतु अद्वेताचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या चुकीमुळे  या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप येथील राजकीय पक्ष करीत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.