राष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारणार नाही - मोहन भागवत

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर आली तरी स्वीकारणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भागवतांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.

Updated: Mar 29, 2017, 03:30 PM IST
राष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारणार नाही - मोहन भागवत title=

नागपूर : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर आली तरी स्वीकारणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भागवतांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.

ज्या बातम्या सध्या माध्यमांतून सुरू आहेत. त्या कधीही प्रत्यक्षात येणार नाहीत. आम्ही संघाचं काम करतो ते करत राहू असंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे. भागवतांना राष्ट्रपती केल्यास पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेनं नुकतीच जाहीर केली होती. पण आता भागवतांना दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.