नागपूर : संघ मुख्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएस सोशल नेटवर्किंगची शक्ती ओळखली आहे. आरएएस आपल्या प्रचार कार्यक्रमात आधुनिकता आणणार आहे. यासाठी आरएसएस मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया एक्टिविस्ट तयार करणार आहे.
तो मुद्दा गो मांसचा असू देत, नाही तर रामजन्म भूमीचा, असहिष्णुता किंवा भारतीय, संघाचा प्रयत्न असेल स्वंयसेवक प्रत्येक विषयावर लेख लिहून, कमेंटर करून पोस्ट करून आपली बाजू भक्कम करतील.
संघाच्या प्रचार विभागाने सोशल मीडियामध्ये सक्रिय स्वयंसेवकांची टीम बनवली आहे. ज्याच्या राष्ट्रीय स्तरावर बैठकी होतात. आता जिल्ह्याच्या ठिकाणीही सक्षम टीम बनवण्याचा त्यांचा निश्चय आहे.
चांगलं टीम वर्क, योग्य माहितीवर आधारीत पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यावर भर असेल, तसेच सभ्य आणि स्पष्ट भाषेत आपले विचार ठेवण्याचं प्रशिक्षण देण्याचा आरएसएसचा विचार आहे.
डिजिटल युगात संघ आपले विचार मुख्य कार्यक्रमामध्ये ठेवणार आहे, टेलिकास्टिंग आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून याचा प्रचार केला जाणार आहे.