प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरु असलेल्या ग्रामसभेत सदस्यावर गोळीबार

२६ जानेवारीनिमित्ताने सुरु असलेल्या ग्रामसभेत गोळीबार झाल्याची घटना घडली. यात ग्रामपंचायत सदस्य जखमी.

Updated: Jan 26, 2016, 05:19 PM IST
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरु असलेल्या ग्रामसभेत सदस्यावर गोळीबार title=

परभणीत : २६ जानेवारीनिमित्ताने सुरु असलेल्या ग्रामसभेत गोळीबार झाल्याची घटना घडली. यात ग्रामपंचायत सदस्य जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

साबळे भोगाव इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा सुरु होती. यावेळी उपसरपंचबाईच्या पतीने हा गोळीबार केलाय.. मनोज राऊत असं गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब साबळे यांनी एमआरजीएसच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी साबळे यांच्यावर मनोज राऊतनं गोळ्या झाडल्या. मात्र साबळे यांनी वेळीच मान झुकवल्यामुळं सुदैवानं ते बचावले.

फिल्मी स्टाइलने गोंधळ घालत मनोजने तीन गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.. या घडलेल्या प्रकारामुळं साबळे यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.