पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून महापालिकेत मानापमान नाट्य

उदघाटन कार्यक्रमांवरून मानापमान नाट्याचा पुढचा अंक पुणे महापालिकेत सुरु झाला आहे. यावेळी निमित्त आहे, मेट्रोचं उदघाटन. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौरांचे नाव नव्हते. त्यानंतर, विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे नाव न टाकून राष्ट्रवादीने त्याचे उट्टे काढले. त्यानंतर आता, मेट्रोच्या उदघाटन कार्यक्रमावरून नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र यावेळी भाजप एकाकी आहे. तर, राष्ट्रवादीला काँग्रेस , मनसे आणि शिवसेनेनेही साथ आहे. 

Updated: Dec 9, 2016, 06:48 PM IST
पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून महापालिकेत मानापमान नाट्य title=
pune metro

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : उदघाटन कार्यक्रमांवरून मानापमान नाट्याचा पुढचा अंक पुणे महापालिकेत सुरु झाला आहे. यावेळी निमित्त आहे, मेट्रोचं उदघाटन. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौरांचे नाव नव्हते. त्यानंतर, विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे नाव न टाकून राष्ट्रवादीने त्याचे उट्टे काढले. त्यानंतर आता, मेट्रोच्या उदघाटन कार्यक्रमावरून नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र यावेळी भाजप एकाकी आहे. तर, राष्ट्रवादीला काँग्रेस , मनसे आणि शिवसेनेनेही साथ आहे. 

पुणे महापालिका निवडणुकीत मुख्य मुकाबला होणार आहे तो , भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये... त्यामुळं महापालिकेच्या कामांचे श्रेय घेण्यावरून या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. केंद्रानं मंजुरी देण्या अगोदरच नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं २४ डिसेंबरला भूमिपूजन होणार असल्याचं जाहीर झालं. त्यावर कुरघोडी म्हणून राष्ट्रवादीनं २२ डिसेंबरला शरद पवार यांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन घेण्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या या निर्णयाला काँग्रेस , मनसे आणि शिवसेनेने देखील पक्षनेत्यांच्या बैठकीत पाठिंबा दिला आहे... 

मेट्रोसाठी पुणे महापालिका दहा टक्के रक्कम देणार आहे. तर, पन्नास टक्के रक्कम कर्ज रूपाने घेतली जाणार आहे. तिकीट विक्रीतून मेट्रोला मिळणाऱ्या महसुलातून हे कर्ज फेडलं जाईल. त्यामुळं ६० टक्के रक्कम पुणेकर देत असताना, महापालिकेला भूमिपूजन कार्यक्रमासाठी साधं विचारात हि घेतलं जात नाही. असा आक्षेप महापौरांनी घेतलाय. तर, राष्ट्रवादीला दहा वर्षाच्या सत्तेत मेट्रो मार्गी लावता आली नाही. त्यांचं हे अपयश झाकण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमावरून राजकारण केलं जात आहे. असा पलटवार भाजपनं केलाय. 

निवडणुकांच्या तोंडावर विकास कामांचं श्रेय कोणी घ्यायचं, हा या वादामागचा मुख्य हेतू आहे. सुद्न्य पुणेकर या वादाचा काय अर्थ घेतात आणि कोणाच्या झोळीत आपलं मत टाकणार हे लवकरच समजणार आहे.