नवी मुंबई महापौर निवडणूक आज

नवी मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार हे आज ठरणार आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला कॉंग्रेस आणि अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. तरीसुद्धा शिवसेनेने चमत्काराची करण्याची भाषा बोलत आहे.

Updated: May 9, 2015, 03:38 PM IST
नवी मुंबई महापौर निवडणूक आज title=

नवी मुंबई: नवी मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार हे आज ठरणार आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला कॉंग्रेस आणि अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. तरीसुद्धा शिवसेनेने चमत्काराची करण्याची भाषा बोलत आहे.

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या सुधाकर सोनावणे आणि शिवसेनेच्या संजू वाडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. १११ सदस्या संख्या असलेल्या महापालिकेत काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर राष्ट्रवादीचं संख्याबळ ६७ झालं आहे. तर युतीकडे ४४ मतं आहेत. 

शिवसेना वारंवार आपला महापौर होण्याची सांगत आहे. तसेच नगरसेवक फोडण्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या अविनाश लाड आणि युतीतर्फे उज्वला झंजाड यांनी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, माजी खासदार संजीव नाईक यांनी शिवसेना आमच्या नगरसवेकांना फोडण्यासाठी ऑफर देत आहेत. त्यामुळे घोडेबाजार होईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.