शहादा येथील अपघातात ६ जागीच ठार, २० जखमी

Updated: Aug 6, 2016, 08:11 PM IST
शहादा येथील अपघातात ६ जागीच ठार, २० जखमी title=

नंदूरबार :  शहादा दोंडाईचा रस्त्यावर रिलायन्स पेट्रोलपंप जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ मजूर जागीच ठार झाले. तर २० जण जखमी झालेत.

मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या आपघातात ६ मजूर जागीच ठार झाले. तर २० जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व मजूर शहादा तालुक्यातल्या मोहिदा गावचे रहिवासी आहेत.