कुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?

गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी)  कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.

Updated: Mar 11, 2015, 03:38 PM IST
कुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'? title=

भंडारा : गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी)  कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.

मध्य भारतातला सर्वांत मोठा मानला जाणारा राष्ट्रपती वाघ... नागझिरा अभयारण्यात दबंग वाघ अशी त्याची ओळख होती... अल्फा नावाची वाघीण आणि दोन पिल्लांसह त्याचं वास्तव्य होतं. मात्र, २०१३ पासून बेपत्ता आहे. त्याच्यासोबतच त्याचा बछडाही बेपत्ता आहे. त्याची शिकार तर झाली नाही अशी शंकाही वन्यजीवप्रेमींतर्फे व्यक्त केली जातेय. 

याप्रकरणी बहेलिया गँगचा सरगणा कुट्ट पारधीला 'सीबीआय'नं अटक केलीय. त्यानं पाच वाघांची शिकार केल्याची कबुली दिलीय. मात्र, राष्ट्रपती वाघाबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही, असं भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी म्हटलंय. 

राष्ट्रपती वाघ आणि त्याचा बछडा सापडत नसल्यामुळे वन विभागाच्या कार्य शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.