वाडा येथे विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे अंभईमधील विवाहित तरूणाने शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघकीस आली आहे. 

Updated: Dec 19, 2015, 08:15 AM IST
वाडा येथे विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार title=

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे अंभईमधील विवाहित तरूणाने शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघकीस आली आहे. 

पीडीत मुलगी आठव्या इयत्तेत शिकत असून शेजारी राहणाऱ्या संदीप रामु सांबरे याच्या घऱी ती गेली असताना या नराधमाने संधीचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला़. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी आरोपी संदीला अटक केली आहे. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.