उल्हासनगर : हॉटेलमध्ये नोकरीला ठेवलेल्या तरुणीवर पहिल्याच दिवशी हॉटेलचालकानं बलात्कार केला. तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी राजकीय वजन वापरत असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील हॉटेलचालकानं एका तरुणीला लिपिकपदी कामाला ठेवलं होतं. कामाच्या पहिल्या दिवशी हॉटेलचालकानं जेवणाच्या बहाण्यानं तिला ‘डॉल्फिन क्लब लॉज’च्या एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार दुपारी साडे तीन वाजता घडूनही पोलीस गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ करीत होते.
शहरातील बहुतांश हॉटेल आणि लॉजवर सेक्स रॅकेट चालत आहे. अॅम्ब्रोसिया, पूनम, डॉल्फिन, चांदणी, १०० डेज आदी लॉज आणि हॉलेटवर पोलिसांनी धाडी टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे.
शहरातील ८० टक्के लॉजिंग-बोर्डिंग आणि हॉटेल मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. तरीही कारवाई होत नसल्यानं मध्यवर्ती पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.