पुण्यात पाच वर्षीय मुलाची नस कापून इंजीनिअर महिलेची आत्महत्या

पुण्यातील माणिकबाग परिसरात असणारया निखिल गार्डन सोसायटीमध्ये आईचा आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आईचं नाव दिप्ती मोरे तर मुलाचं नाव अर्णव मोरे 

Updated: Oct 11, 2015, 08:22 PM IST
पुण्यात पाच वर्षीय मुलाची नस कापून इंजीनिअर महिलेची आत्महत्या title=

पुणे: पुण्यातील माणिकबाग परिसरात असणारया निखिल गार्डन सोसायटीमध्ये आईचा आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आईचं नाव दिप्ती मोरे तर मुलाचं नाव अर्णव मोरे 

आहे. 

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या या उच्चशिक्षित महिलेनं आपल्या मुलाच्या हाताची नस कापून त्याची हत्या केली आणि नंतर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. निखील गार्डनच्या तिसऱ्या मजल्यावर दिप्ती आणि तेजस मोरे गेल्या सात वर्षापासून राहत होते. त्यांना एकुलता एक पाच वर्षाचा मुलगा अर्णव सोबत राहत होता. हे दोघंही सॉप्टवेअर इंजीनिअर आहेत. 

आणखी वाचा - विषारी सापाशी खेळणे तरुणाच्या जीवावर बेतले

घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ही घटना आपआपसातील तणाव आणि वादातून घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जातेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.