रामदास आठवलेंचे वादग्रस्त विधान

ग्रामीण भागातल्या राजकारणासाठीच मराठा समाजाकडून अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. 

Updated: Oct 15, 2016, 04:19 PM IST
रामदास आठवलेंचे वादग्रस्त विधान title=

नाशिक : ग्रामीण भागातल्या राजकारणासाठीच मराठा समाजाकडून अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. 

ते नाशिकमध्ये बोलत होते. तसंच ऍट्रॉसिटी कायदा रद्द होऊ शकत नाही असंही आठवलेंनी स्पष्ट केलंय. 

अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी केलेले हे विधान वादग्रस्त ठरु शकते.