तर वेगळी भूमिका घेऊ, राजू शेट्टींचा भाजपला इशारा

भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठींबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Updated: Jan 29, 2017, 07:14 PM IST
तर वेगळी भूमिका घेऊ, राजू शेट्टींचा भाजपला इशारा title=

बारामती : भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठींबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले, त्या राष्ट्रवादीचा भाजपनं पाठींबा घेणं कदापि मान्य नसून तसे झाल्यास योग्यवेळी योग्य भूमिका घेऊ असं शेट्टी म्हणाले आहेत.  

एकीकडे युतीतील शिवसेना भाजप एकामेंकाविरुद्ध आग ओकत असताना, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बारामतीत बैठक पार पडली.