ऊसाला ३२०० रूपये भाव द्या - खासदार शेट्टी

ऊसाला पहिली उचल 3,200 रुपये मिळालीच पाहीजे अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिलाय.. यंदा एफआरपीवर समाधान मानणार नाही असंही शेट्टी म्हणालेत.

Updated: Oct 25, 2016, 07:28 PM IST
ऊसाला ३२०० रूपये भाव द्या  - खासदार शेट्टी title=

कोल्हापूर : ऊसाला पहिली उचल 3,200 रुपये मिळालीच पाहीजे अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिलाय.. यंदा एफआरपीवर समाधान मानणार नाही असंही शेट्टी म्हणालेत.

पाच नोव्हेंबरपर्यंत उसाच्या दराबाबत निर्णय घेण्याची मागणीही शेट्टी यांनी केलीय. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १५व्या ऊस परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते.  या परिषदेला राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील हजर होते.