मुंबई: शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीका केली. विमानात बसल्यावर मोदींना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आठवला, मोदींनी शरिफांना केक भरवला आणि त्यानंतर इकडे पठाणकोट हल्ला झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
तसंच आंदोलनं अर्धवट सोडण्याच्या टीकेलाही राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं, राम मंदिरासाठी भाजपनं आंदोलन केलं, मग राम मंदिर कुठे गेलं, राम मंदिराचा प्रश्न कोर्टात आहे सांगणाऱ्या भाजपचे अमित शहा कोर्टातून सुटतात, मग राम मंदिराचा प्रश्न का सुटत नाही, असे सवालही त्यांनी विचारले.
100 दिवसांमध्ये अच्छे दिन येणार सांगणाऱ्या मोदींना अजून अच्छे दिन आणता आले नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच एकही भूल कमल का फूल म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.