राज ठाकरेंनी तीन नगरसेवकांची केली हकालपट्टी

ठाणे महापालिकेतले मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासह तेजस्विनी चव्हाण आणि राजश्री सुनील नाईक या तिघा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Updated: Mar 31, 2015, 07:00 PM IST
राज ठाकरेंनी तीन नगरसेवकांची केली हकालपट्टी title=

ठाणे : ठाणे महापालिकेतले मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासह तेजस्विनी चव्हाण आणि राजश्री सुनील नाईक या तिघा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षादेश न पाळल्यानं आणि पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी त्यांनी पक्षादेश धुडकावला होता. पक्षानं शैलेश पाटील आणि रूचिता मोरे यांची नावे सुचवली असताना, सुधाकर चव्हाणांनी परस्पर राजश्री नाईकांचे नाव दिले. त्यामुळं त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आलीय.

ठाणे मनपातील स्थायी समितीचे सभापती सुधाकर चव्हाण, नगरसेविका तेजस्विनी चव्हाण व राजश्री सुनील नाईक या तिघांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.