नवी मुंबईत दिघावासियांकडून रेलरोको

नवी मुंबईत दिघाजवळ रेलरोको करण्यात आला आहे, दिघावासियांनीच हा रेलेरोको केला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2017, 02:36 PM IST
नवी मुंबईत दिघावासियांकडून रेलरोको title=

नवी मुंबई : नवी मुंबईत दिघाजवळ रेलरोको करण्यात आला आहे, दिघावासियांनीच हा रेलेरोको केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

दिघाजवळ ठाणे-वाशी ट्रेन रोखण्यात आली, यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तसेच आंदोलकांची समजूत काढली. रेलेरोकोवर शांततेने मार्ग काढण्याचा उपाय पोलिसांनी सुरू ठेवला आहे.

दिघ्यात आज २ इमारती खाली करण्यात येत आहेत, त्या विरोधात हा रेलेरोको असल्याचं सांगण्यात येत आहे. इमारती खाली करण्याची कारवाई थांबवण्याची मागणी दिघा वासियांनी केली आहे.