नाशिकच्या रणसंग्रामात चर्चा 75 वर्षांच्या आजींची

नाशिक महापलिकेत नगरसेवक होण्याची तयारी तरुण उच्चशिक्षित महिलांनी केली आहे. पन्नास टक्के आरक्षणाबरोबरच पुरुषांच्या जागेतही अनेक महिला मैदानात उतरल्यात. या सर्वात हटके ठरल्या आहेत पंचाहत्तर वर्षाच्या आजी.  

Updated: Feb 13, 2017, 02:14 PM IST
नाशिकच्या रणसंग्रामात चर्चा 75 वर्षांच्या आजींची title=

नाशिक : नाशिक महापलिकेत नगरसेवक होण्याची तयारी तरुण उच्चशिक्षित महिलांनी केली आहे. पन्नास टक्के आरक्षणाबरोबरच पुरुषांच्या जागेतही अनेक महिला मैदानात उतरल्यात. या सर्वात हटके ठरल्या आहेत पंचाहत्तर वर्षाच्या आजी.  

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. भिकूबाई बागुल या 75 वर्षांच्या आजीबाई नाशिकच्या प्रभाग क्रमांक सहामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात..  उतारवयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.. 

नाशिक शहराचे महापौर अशोक मुर्तडक हे तीन महिला भगिनींसोबत प्रभागात उतरलेत.. मखमलाबाद या शेतकरी परिसरात मुर्तडकांसोबत असलेल्या छाया काकड यांच्या विरोधात भाजपनं भिकूबाईंना उमेदवारी दिलीये. समस्या सोडविण्याची धमक लागते ती असली तर कुणीही नगरसेवक होऊ शकतो असे भिकूबाईंना वाटतं...

उमेदवारी मिळाल्यानंतर भिकूबाईं विजयश्री खेचून आणण्यासाठी पूर्ण ताकतिनीशी प्रचाराला सुरुवात केलीये. आता मतदारराजा या धडाडीच्या उमेदवाराच्या पदरी किती मतांचं दान करतो हे निवडणूकीनंतरच कळेल.