सांगली : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तासगाव तालुक्यात एबी फॉर्मच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झालाय.
मुदत संपल्यानंतर भाजपच्या उमेदवारांचे एबी फ़ॉर्म कोरेच असल्याचा आरोप दिवंगत आर आर पाटलांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या स्मिता पाटील यांनी केलाय. तसंच या अर्जांवर भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्याही सह्या नसल्याचा दावा केलाय.
राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील आणि स्मिता पाटील निवडणूक कार्यालयात गेल्या असता त्यांना हा प्रकार आढळून आला. त्यामुळं त्यांनी निवडणूक अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी केलीय.
तर भाजप पदाधिका-यांनी आणि निवडणूक अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.