विद्यापीठाची प्रश्नपत्रिका व्हॉटस अॅपवर फुटली

पुणे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर फुटल्यानं नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडालीय. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबतही तक्रार असल्यानं नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षणपद्धतीला छेद देणाऱ्या या घटनेनं शिक्षणव्यवस्था हादरलीय.   

Updated: Nov 19, 2014, 09:20 PM IST
विद्यापीठाची प्रश्नपत्रिका व्हॉटस अॅपवर फुटली title=

नाशिक : पुणे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर फुटल्यानं नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडालीय. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबतही तक्रार असल्यानं नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षणपद्धतीला छेद देणाऱ्या या घटनेनं शिक्षणव्यवस्था हादरलीय.   

अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमाची.सिव्हील शाखेची प्रश्नपत्रिका व्हॉटस अॅपवरून लीक झालीय. मात्र ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती परीक्षेत नव्हे तर परीक्षेपूर्वी हातात आलीय. विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये थेट व्हॉटस ऍपवर आलेली ही प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी आलेली आहे. 

नाशिकच्या एका केंद्रावर मिळालेल्या या प्रश्नपत्रिकेमुळे अभ्यास करून परीक्षा देणा-या मुलांनी याचा धसका घेतलाय. त्यांनी या प्रकाराबाबत पुणे विद्यापीठातही तक्रार केलीय. अशा प्रश्नपत्रिका केवळ अभियांत्रिकीच्याच नव्हे तर गेल्या दोन वर्षांपासून सर्वच विभागांच्या बारकोड नसलेल्या प्रश्नपत्रिका  मिळतायत. 

फेसबुक, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या फोटो ऑप्शनच्या माध्यमातून हे केलं जातंय. प्रुफ रीडिंग करण्याच्या आधीच ही प्रश्नपत्रिका तयार होत असावी, असा आरोप विद्यार्थी करतायेत.           
एमबीए, व्यवस्थापन विभागातल्या मार्केटिंग विक्री विपणन या शाखेत सर्रास असे प्रकार गेल्या दोन वर्षापासून होतायत. आता अभियांत्रिकीसारख्या गंभीर विषयांत असं होऊ लागल्यानं प्रामाणिक आणि अभ्यासू मुलं याविरोधात एकवटलीयत. 

शिक्षकही याबाबत दबक्या आवाजात चर्चा करतायत. काही विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. या प्रकारातली सत्यता बाहेर यावी यासाठी कुलगुरूंनी गंभीर दाखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. 

पेपर फुटीची आधुनिक पद्धत आणि त्यातून होणारा व्यवसाय याची चर्चा सुरु झालीये. या प्रकरणाचा तपास गंभीरतेनं करून पोलिसांनी आता खरे गुन्हेगार शोधून काढण्याची गरज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.