नवी मुंबई : खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इथल्या पाळणाघराची तोडफोड करण्यात आली.
पाळणाघरात बाळाला झालेल्या अमानूष मारहाणीचा संताप विविध घटकांमधून व्यक्त होताना दिसतोय. पूर्वा प्ले स्कूल शासनानं बंद करावं अन्यथा आम्ही ते चालू देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलीय.
दरम्यान, खारघर 10 महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाणीच्या प्रकरणात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अफसाना शेख आणि प्रियंका निकम यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान प्रियंका निकमला मिळालेल्या जामिनाविरोधात खारघर पोलीस कोर्टात अपील दाखल करणार आहे.