पुण्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा

पुण्यामध्ये अखेर पाणीबाणी घोषित झालीय. येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुणेकरांना मिळणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

Updated: Sep 4, 2015, 04:14 PM IST
पुण्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा title=

पुणे : पुण्यामध्ये अखेर पाणीबाणी घोषित झालीय. येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुणेकरांना मिळणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

जूनमध्ये सरासरी ओलांडलेल्या पावसानं पुढच्या काळात दडी मारली. त्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला या धरण  साखळीतून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. मागील वर्षी आजच्या तारखेला या धरणांमध्ये २८. १९ टी एम सी म्हणजेच ९६. ७१ % पाणीसाठा उपलब्ध होता.
 
यावर्षी तो केवळ १४. ६४ टी एम सी म्हणजेच ५० . २२ % इतकाच आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठा वर्षभर पुरवण्यासाठी पाणीकपातीशिवाय पर्याय नव्हता. उपलब्ध पाणी पुढील किमान वर्षभर पुरेल असे नियोजन महापालिका तसेच सिंचन विभागाच्या प्रशासनाने केलंय. त्यानुसार पुणेकरांना दिवसाला १२५० एम एल डी ऐवजी ८५० एम एल डी पाणी मिळणार आहे. सणासुदीच्या काळात त्यामध्ये  गरजेनुसार वाढ करण्यात येईल. त्याचप्रमाणे धरणांमधून शेतीसाठी कालव्याद्वारे देण्यात येणारं पाणी थांबवण्यात आलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.