आर्कीटेक्टची दमदाटी, आयएएस अधिकाऱ्याची तब्येत बिघडली

एसआरएमध्ये बिल्डर आणि त्यांच्या आर्कीटेक्टचं राज्य आहे की काय असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. आर्कीटेक्ट संदीप महाजन यांनी थेट आयएएस अधिका-याला दमदाटी केलीय. 

Updated: Oct 27, 2016, 07:58 PM IST
आर्कीटेक्टची दमदाटी, आयएएस अधिकाऱ्याची तब्येत बिघडली title=

पुणे : एसआरएमध्ये बिल्डर आणि त्यांच्या आर्कीटेक्टचं राज्य आहे की काय असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. आर्कीटेक्ट संदीप महाजन यांनी थेट आयएएस अधिका-याला दमदाटी केलीय. 

आर्कीटेक्टच्या दमदाटीमुळे एसआरएचे अ्ध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लहुराज माळी यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. 

आयएएस अधिका-याला दमदाटी झाल्याने खळबळ उडालीय. या घटनेचा निषेध म्हणून एसआरए कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. 

महाजन यांच्यासोबतच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडीया यांनीही माळी यांना फोनवरून दमदाटी केलीय. 

माळी यांच्याशी वाद झाल्याचं महाजन यांनी मान्य केलं आहे. माळी कामच करत नसल्याने त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती माळी यांना दिली हेही महाजन यांनी मान्य केलं आहे.