खासगी शाळेच्या मनमानीला पालक कंटाळले

गुहागरमधल्या बालभारती पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये  वादाची ठिणगी उडालीय आणि याला कारण आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 5, 2017, 08:51 PM IST
खासगी शाळेच्या मनमानीला पालक कंटाळले title=

रत्नागिरी : गुहागरमधल्या बालभारती पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये  वादाची ठिणगी उडालीय आणि याला कारण आहे, शाळेनं केलेली अवाजवी फी वाढ.

पालकांना कोणत्याही प्रकारे विश्वासत न घेता ही फी वाढ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय... तसेच जेवढी फी ही शाळा घेते तेवढी सुखसोई या शाळेकडून दिल्या जात नसल्याचा आरोपही पालकांनी केलाय.. शिवाय शाळेनं अद्याप शिक्षक पालक संघ आणि शालेय शिक्षण कमिटी देखील स्थापन केलेली नाही

सीबीएसई बोर्डाची ही शाळा RGPPL कंपनीच्या कामगारांच्या मुलांसाठी आणि कंपनी लगतच्या गावातील मुलांसाठी सुरू करण्यात आलीय.. मात्र शाळा नुसती फी वाढ करत नाही तर मुलांसाठी लागणारी पुस्तकं आणि गणवेश देखील शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय.

शाळा प्रशासनानं मात्र पालकांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. नियमाप्रमाणेच फी वाढ केल्याचा दावा शाळा प्रशासनानं केलाय. शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केलाय..

शाळेकडून पुस्तकं तसेच गणवेश खरेदीची सक्ती करुन नये असा जीआर सीबीएसई बोर्डानं काढलाय. बोर्डाचे हे निर्देश झुगारणा-या शाळांची मान्यता रद्द करण्याची तरतूदही करण्यात आलीये. त्यामुळे बालभारती पब्लिक स्कुल प्रशासन फी वाढीबाबत काय निर्णय घेते याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.