साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉर, संघाची उडी

साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉरमध्ये आता आरएसएसनंही उडी मारली. साईबाबांनी आपण देव असल्याचं कधीच म्हंटलं नव्हतं ते फक्त संत होते असं आरएसएसनं म्हंटलय. 

Updated: Nov 1, 2015, 04:44 PM IST
साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉर, संघाची उडी title=

नागपूर : साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉरमध्ये आता आरएसएसनंही उडी मारली. साईबाबांनी आपण देव असल्याचं कधीच म्हंटलं नव्हतं ते फक्त संत होते असं आरएसएसनं म्हंटलय. 

संघटना स्वामी शंकराचार्य यांची बाजू घेत नसली तरी जे सत्य आहे ते लोकांसमोर आणणं गरजेचं असल्याचं आरएसएसकडून सांगण्यात आलाय. हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा द्वारकापीठाच्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंदांनी एक पोस्टर जाहीर केलं, ज्यात हनुमान साईबाबांना एक झाड उखडून मारताना दाखवण्यात आलंय.

साईबाबा या पोस्टरमध्ये पळताना दाखवण्यात आलेत. ज्या ज्या ठिकाणी साईबाबांची मंदिरं आहेत, त्या त्या ठिकाणी आपण हनुमानाचं मंदिर उभारणार असल्याची घोषणाही शंकराचार्यांनी केली आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.