भेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!

शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला. 

Updated: Aug 15, 2015, 08:13 PM IST
भेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला! title=

मुंबई : शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला. 

निमित्त होतं दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं... या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, शिवराज पाटील हे राजकारणातले दिग्गज एकाच व्यासपीठावर आले होते. 

यावेळी पंकजा यांनी विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. याच वेळी बोलताना पंकजा यांनी शरद पवारांना दिलीपकुमार यांची उपमा दिली... 

पवार आणि मुंडे यांच्यातल्या या राजकीय जुगलबंदीनं उपस्थितांना मात्र खळखळून हसवलं..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.