संगणक शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, पाण्याचा मारा

संगणक शिक्षकांना पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कालपासून आंदोलन करत असलेल्या शिक्षकांवर आज बळाचा वापर केला. 

Updated: Dec 6, 2016, 10:51 PM IST
 संगणक शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, पाण्याचा मारा title=

नागपूर : संगणक शिक्षकांना पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कालपासून आंदोलन करत असलेल्या शिक्षकांवर आज बळाचा वापर केला. 

हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी पूर्ण राज्यातून शिक्षक कालपासून आंदोलन करत आहेत.

शिक्षण मंत्री विनोद तावड़े यांनी स्वतः येऊन आंदोलनकर्त्यांशी भेट घ्यावी ही मागणी शिक्षकांनी लावून धरली, पोलिसांनी लावलेले बैरिकेड्स तोडले.

उग्र रूप धारण केलेल्या जामवाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर पाण्याचा मारा केला.