चाकणमध्ये शेकडो अत्यंत विषारी साप जप्त

पुण्याच्या चाकण सहारा सिटीमध्ये पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 100 पेक्षा जास्त साप जप्त करण्यात आलेले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 27, 2016, 12:35 PM IST
चाकणमध्ये शेकडो अत्यंत विषारी साप जप्त title=

पुणे : पुण्याच्या चाकण सहारा सिटीमध्ये पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 100 पेक्षा जास्त साप जप्त करण्यात आलेले आहेत.

या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.

हे सर्व 100 च्या आसपास असणारे साप विषारी असल्याचं सांगण्यात येत आहे. यातील काही सापांचं विष काढण्यात आले आहे. 

या सापांच्या विषाचा नेमका काय उपयोग होत होता आणि ते कुणाला विकलं जात होतं याचा शोध पोलीस घेत आहेत.