पुणे : शेतक-यांची वीज बिलं, विविध करांची वसुली आणि शेतक-यांच्या मुलांना फी माफीसह शिष्यवृत्ती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आपली धोरणे बदलावीत नाहीतर डिसेंबरमध्ये राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.
आम्हाला दुष्काळावरुन राजकारण करायचे नाही. ७२ आणि आताच्या दुष्काळात फरक आहे. आज कामाची मागणी आहे. ७२ ला पिण्याच्या पाण्याचे संकट नव्हते. आज आहे, असे पवार म्हणालेत.
काही लोक आमच्या दौ-यावर टीका करतात. दुष्काळावर टीका करण्याची आजची परिस्थिती नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांनी लगावला. पवार यांनी दुष्काळाचा दौरा केल्यानंतर राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला पवार यांनी हे उत्तर दिलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.