कुंभमेळ्यातला 'नो सेल्फी झोन'!

प्रेक्षणीय स्थळांपासून ते शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढणारे आपण पाहिले असतील. या सेल्फी प्रेमींचा उत्साह कुंभमेळ्यातही रामकुंडावर एव्हढा पाहायला मिळाला की अखेर रामकुंड हा नो सेल्फी झोन घोषित करावा लागला.

Updated: Sep 5, 2015, 12:45 PM IST
कुंभमेळ्यातला 'नो सेल्फी झोन'! title=

नाशिक : प्रेक्षणीय स्थळांपासून ते शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढणारे आपण पाहिले असतील. या सेल्फी प्रेमींचा उत्साह कुंभमेळ्यातही रामकुंडावर एव्हढा पाहायला मिळाला की अखेर रामकुंड हा नो सेल्फी झोन घोषित करावा लागला.

प्रत्येक काळाची स्वतःची अशी एक क्रेझ असते. कधी ती स्टाईल स्टेटमेंट होऊन जाते... तशीच सध्या क्रेझ आहे सेल्फीची... या सेल्फीची क्रेझ जागतिक पातळीवरच्या नेत्यांनाही आहे... जशी ती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आहेच की!

नाशिकचं रामकुंड हा तसा रमणीय परिसर... विविध मंदिरं, गोदामायीचे घाट, आणि कुंभमेळ्यामुळे सगळीकडे असलेलं उत्साही वातावरण यामुळे रामकुंडावर सेल्फी काढणाऱ्यांची सध्या मोठी गर्दी होतेय. शाहीस्नानाच्या दिवशी अगदी पोलिसांनाही हा मोह आवरला नाही. मात्र या सेल्फीप्रेमींच्या उत्साहामुळे गर्दी होते. अखेर प्रशासनाला हा नो सेल्फी झोन घोषित करावा लागलाय. 
 
सेल्फीप्रेमी स्वतःच्याच नादात असतात त्याचा त्रास गर्दी नियंत्रित करणाऱ्या पोलिसांना होतो. त्यामुळे या नो सेल्फी झोनच्या निर्णयाला पोलीस अधिकारी खासगीत पाठिंबा देत आहेत तर हा कुंभमेळा आहे की बंधनमेळा असा सवाल भाविक विचारत आहेत. 

पहिल्या शाही स्नानाच्या वेळी प्रशासनाने केलेल्या कडेकोट बंदोबस्तावर भाविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दुसऱ्या पर्वणीसाठी काही प्रमाणात शिथीलता आणावी लागली. मात्र दुसरीकडे रामकुंडाला नो सेल्फी झोन जाहीर करून प्रशासनाने पुन्हा नाराजी ओढवून घेतलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.