पिंपरीचा Tree Man तुम्हाला माहिती का...

तसा तो पैलवान...पण अचानक त्याला एक छंद जडला...! छंद ही असा जो अनेकांना प्रेरणा देणारा...! कोण आहे हा पैलवान आणि काय आहे त्याचा छंद पाहुयात 24 तास विशेष

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 5, 2017, 05:49 PM IST
 पिंपरीचा Tree Man तुम्हाला माहिती का...  title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : तसा तो पैलवान...पण अचानक त्याला एक छंद जडला...! छंद ही असा जो अनेकांना प्रेरणा देणारा...! कोण आहे हा पैलवान आणि काय आहे त्याचा छंद पाहुयात 24 तास विशेष

पिंपरी चिंचवडच्या ताथवडे परिसरातला पैलवान सचिन पवार.. पैलवान त्यात गाववाला त्यामुळं सचिनला मोठा मित्र परिवार आहे. 

फेसबुकवरही त्याचे हजारो मित्र आहेत. याच मित्रांना तो प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देतो. पण शुभेच्छा देताना तो प्रत्येकाला झाड देतो. आणि हाच त्याचा आगळा वेगळा छंद आहे. सकाळी सकाळी फेसबुक ओपन करायचे आणि वाढदिवस कोणाचा आहे ते पाहायचं. 

घरात आधीच आणलेली झाडं असतातच. ज्याचा वाढदिवस आहे त्याला फोन करायचा आणि त्याला झाड भेट द्यायचं घर छोटं असेल तर तुळशी, मध्यम असेल तर वेगळं झाड आणि भरपूर जागा असेल तर नारळ, सुपारी अशी झाडे सचिन भेट देतो. गेल्या 10 महिन्यांपासून सचिनला हा छंद जडलाय.  आतापर्यंत त्याने 5 हजार हून अधिक फेसबुक मित्रांना झाडे भेट दिलीयेत...

पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली उदासीनता, ग्लोबल वार्मिंगचं संकट यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्हा आम्हा सर्वांनाच हातभार लावावा लागणार आहे, त्यासाठी सचिनचा छंद आदर्श म्हणावा लागेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x