प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस ४० मिनिटे रोखली

रेल्वे स्थानकातून अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस रोखून धरली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 2, 2017, 07:57 PM IST
प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस ४० मिनिटे रोखली title=

वर्धा : रेल्वे स्थानकातून अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस रोखून धरली होती. मासिक पासधारकांवरील कारवाईविरोधात प्रवाशांनी हे आंदोलन केलं. संतप्त प्रवाशांनी तब्बल ४० मिनिटे ही एक्स्प्रेस अडवून ठेवली होती. बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा इथून हजारो लोक प्रवास करतात. 

जनरल डब्ब्यात जागा मिळत नसल्याने हे प्रवासी आरक्षित डब्ब्यात बसतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केलीय. आणि त्याचाच संताप व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी ही गाडी अडवून ठेवली होती. स्टेशन प्रबंधक आणि आंदोलक प्रवासी यांच्यात चर्चा झाल्यानंतर ही विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडे रवाना झाली.