परमार आत्महत्या : सर्वपक्षीय नेत्यांना लाखोंचा निवडणूक निधी दिल्याची डायरीत नोंद

सूरज परमार आत्महत्या प्रकरणात रोज नवनवी माहिती उघड होतेय. २०१४ मध्ये परमार यांच्यावर आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत सर्वपक्षीय नेत्यांना निवडणूक निधी म्हणून १९ कोटी रुपये दिल्याची नोंद आहे.

Updated: Dec 4, 2015, 10:29 PM IST
परमार आत्महत्या : सर्वपक्षीय नेत्यांना लाखोंचा निवडणूक निधी दिल्याची डायरीत नोंद title=

ठाणे : सूरज परमार आत्महत्या प्रकरणात रोज नवनवी माहिती उघड होतेय. २०१४ मध्ये परमार यांच्यावर आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत सर्वपक्षीय नेत्यांना निवडणूक निधी म्हणून १९ कोटी रुपये दिल्याची नोंद आहे.

परमान यांच्या डायरीत ठाण्यातील शिवसेनेच्या दोन नेत्यांना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय प्रत्येकी एका नेत्याला तर मनसेच्या एका नेत्याला लाखो रूपये निवडणूक निधी दिल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. 

पोलिसांच्या ताब्यात ही डायरी आली आहे. त्याचा वापर पुरावा म्हणून ठाणे पोलीस करणार आहेत. याबाबत मोठमोठ्या नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एकूण १९ कोटी खर्च झाल्याची नोंद डायरीत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.