मुंबई : पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आनंदाची बातमी दिलीय. चंदू चव्हाण आपल्या ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याने दिलीय.
चंदू चव्हाण यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर भारताकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं डॉ. भामरे यांनी सांगितलंय. त्यामुळे लवकरात लवकर चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.