आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!

जगभरात प्रसिद्ध असलेली येवला पैठणी... ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला येवल्याला जायची अजिबात गरज नाही... अगदी घरबसल्या तुम्ही ती खरेदी करू शकता. 

Updated: May 25, 2016, 09:51 PM IST
आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी! title=

चेतन कोळस, येवला : जगभरात प्रसिद्ध असलेली येवला पैठणी... ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला येवल्याला जायची अजिबात गरज नाही... अगदी घरबसल्या तुम्ही ती खरेदी करू शकता. 

पैठणी आवडत नाही अशी स्त्री सापडणं कठीण आहे. नटून थटून पैठणी नेसून मिरवायला कुणाला आवडत नाही? त्यात ही पैठणी येवल्याची असेल, तर काय विचारायलाच नको... जगभरातून पैठणी प्रेमी येवल्याला येतात ते हे रेशमी महावस्त्र खरेदी करायला... पण आता घरबसल्या देखील पैठणी खरेदी करता येणार आहे.

'ई बे' शॉपिंग वेबसाईटचा पुढाकार... 

'ई बे' या ऑनलाइन शॉपिंग कंपनीनं ही खास सोय ३९ देशातल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलीय. व्हिव्हर्स सेंटर, वस्त्रोद्योग विकास आयुक्त आणि ई बे या कंपनीच्या संयुक्त विद्यमानं हा ऑनलाइन पैठणी विक्रीचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. 

आणखी काय... 

- सुरूवातीला तीन ते चार महिने विणकरांकडून नोंदणी फी आकारली जाणार नाही.

- नंतर १० टक्क्यांऐवजी केवळ एक टक्के एवढीच विक्री फी आकारली जाईल.

- त्यासाठी पैठणी विणकरांना खास प्रशिक्षणही देण्यात आलंय

- E BAY कडून अकाऊंट मॅनेजमेंट सपोर्टही दिला जाईल, असं कंपनीनं स्पष्ट केलंय.

या ऑनलाइन विक्रीमुळं येवल्याची पैठणी आता सातासमुद्रापार आपला ठसा सहज उमटवेल, एवढं निश्चित...